वाळुची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकाकडून 12 हजार रुपये लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

वाळुची वाहतूक करण्याऱ्या ट्रॅक्टर मालकाकडून हप्ता म्हणून 12 हजार रुपये लाच घेताना  मौजीपुर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार व खासगी व्यक्तीला (हॉटेल मालक) जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  सापळा रचून रंगेहाथ पकडले. जालना एसीबी युनिटने ही कारवाई शुक्रवारी (दि.7) एका हॉटेलमध्ये केली. पोलीस अंमलदार चैनसिंग कपुरचंद नागलोत आणि हॉटेल मालक ‍ज्ञानेश्वर उर्फ माऊली सुभाषराव रायमुले  (वय-36 रा. डांबरी ता.जि. जालना) अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत 32 वर्षाच्या तक्रारदाराने जालना एसीबीकडे गुरुवारी (दि.6) तक्रार केली आहे. तक्रारदार हे दुधना नदीच्या  पात्रातून वाळू उपसा करुन त्याची ट्रॅक्टर (MH 20 EE 3844) मधून वाहतूक करतात. नदी पात्रातुन वाळू उपसा करण्यासाठी तक्रारदार यांनी रितसर रॉयल्टी भरली आहे. मात्र, तक्रारदार यांचा वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलीस अंमलदार चैनसिंग नागलोत यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जात असल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रारदार यांच्या तक्रारीची गुरुवारी पंचासमक्ष पडताळणी केली असता,
तक्रारदार यांच्याकडे पोलीस अंमलादर चैनसिंग नागलोत याने खासगी व्यक्ती माऊली रायमुले याच्यामार्फात फोन करुन 15 हजार रुपये लाच मागितली.
तसेच तडजोडी अंती 12 हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले.
नागलोत याने लाचेची रक्कम रायमुले यांना देण्यास सांगितले. शुक्रवारी माऊली रायमुले यांच्या हॉटेलमध्ये सापळा रचण्यात आला.
नागलोत याच्या सांगण्यावरून रायमुले याला तक्रारदार यांच्याकडून 12 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
पुढील तपास जालना एसीबीचे पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर करीत आहेत.

कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे  अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, जालना एसीबी पोलीस उप अधीक्षक सुदाम पाचोरक यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर पोलीस अमंलदार गजानन घायवट, गजानन कांबळे ,गणेश भुजाडे, प्रवीण खंदारे, गणेश चेके, ज्ञानेश्वर यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e