याबाबत पाेलीसांकडून मिळालेली माहिती अशी : शिक्षण विभागाची विद्यार्थ्यांसमवेत वेरुळला सहल गेली होती. ही सहल 30 सप्टेंबरला परतीच्या मार्गावर हाेती. त्यावेळी प्रवासा दरम्यान अंधाराचा फायदा घेत बसमधील शेजारच्या सीटवर बसुन शिक्षण विस्तार अधिका-याने महिलेशी अश्लील चाळे केले.
संबंधीत अधिक्षीकेने झालेला प्रकार एक तारखेला प्रकल्प अधिकारी यांना सांगितला. यानंतर संबंधीत पिडीत अधिक्षीकेला दामिनी पथकाकडे पाठवण्यात आले होते. त्यानंतर तिने शहादा पोलीसांत गुन्हा दाखल झाला.
आर.जे. मुसळे असे अटक केलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी याचे नाव आहे. या प्रकरणाचा तपास पाेलीस करीत असल्याची माहिती शहादा पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी दिली.
0 Comments