आदिवासी तरुणाची हत्या; पाटचारीत आढळला मृतदेह

चोपडा  : अकुलखेडा (ता. चोपडा) येथील ३० वर्षीय आदिवासी तरुणाची गुप्तांगावर वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत शहर  पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश वेरसिंग सस्ते (पावरा) (वय ३०, रा. पिसनाबल, जि. बडवाणी, ह. मु. अकुलखेडा, ता. चोपडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
चोपडा - अकुलखेडा रस्त्यावर पाटाच्या चारीजवळ दिनेश सस्तेचा मृतदेह आढळून आला होता. दोन ऑक्टोबरच्या सायंकाळी साडेचार ते ३ ऑक्टोबरच्या सकाळी साडेदहापूर्वी कुणी अज्ञात व्यक्तीने कोणत्या तरी कारणावरून त्याचा खून  केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले.
दिनेशच्या गुप्तांगावर गंभीर दुखापत आढळून आली आहे. या प्रकरणी मृताचा भाऊ दिलीप वेरसिंग सस्ते (पावरा) यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण तपास करीत आहेत

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e