गाडीच्या डिक्कीत पैसे ठेवताय? मग हा व्हिडीओ पाहाच, 2 लाख रुपये 10 सेकंदात केले गायब, VIDEO

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी एका सेवानिवृत्त शिक्षिकेला फसवत लाखो रुपये फसवल्याची घटना ताजी असतानाच दुसरी एक घटना समोर आली आहे. सेवानिवृत्त शिक्षकाने बँकेतून काढून आणलेली 2 लाख रुपयांची रोकड मोटारसायकलच्या डिक्कीतून चोरट्याने लांबवली. ही घटना भडगाव रोडवर घडली असून रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त शिक्षक बँकेतून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी ती रक्कम काढून आणत आपल्या मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवली होती. दरम्यान त्यांच्यावर पाळत ठेवलेल्या चोरट्यानी त्यांच्या मोटारसायकलमधील पैसे चोरल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. ही घटना भडगाव रोडवर घडली असून रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे. टाकळी प्रचा येथील सेवानिवृत्त शिक्षक सुधाकरराव विठ्ठल पाटील यांनी दुपारी दीडच्या सुमारास शहरातील भडगाव रोड वरील युनियन बँकेतून दोन लाख रुपयांची रक्कम काढली व ही रक्कम त्यांनी बँकेच्या बाहेर मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवली.

त्याचवेळी पासबुक बँकेत राहिल्याचे लक्षात येताच ते पुन्हा बँकेत गेले. हीच संधी साधत बाहेर पाळत ठेवणाऱ्या तिघांपैकी एकाने डिक्की उघडून त्यातून रक्कम काढून घेत पळ काढल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. दरम्यान पाटील हे काही वेळानंतर परत आल्यावर डिक्कीत ठेवलेली रक्कम गायब झाल्याचे आढळले.

त्यानंतर त्यांनी बँक व बाहेर अनेकांना ही माहिती दिली. राञी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गाठून घटनेची खबर दिली. दरम्यान पोलीस अधिक तपास करत आहेत. अद्यापही काही निष्पण्ण झाले नसल्याचे सांगण्यात आले


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e