शेतकरी पिता-पुत्रावर हल्ला; एकाचा जागीच मृत्यू

तालुक्यातील कातरवाडी  येथील सोपान बाबुराव झाल्टे  हे त्यांच्या राहत्या घरात पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले असताना अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केल्याने या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू  झाल्याची घटना घडली आहे...
या हल्ल्यात मयताचे वडील बाबुराव महादू झाल्टे हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या घटनेची माहिती मिळताच मनमाड उपविभागीय अप्पर पोलीस अधीक्षक समीर सिंग साळवे व चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर  यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात  मनीषा सोपान झाल्टे यांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरुद्ध भादवी ३०२ आणि ३०७ प्रमाणे गुन्हा  दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे 



Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e