मुलीवर अत्याचार : तरुणाला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

जळगाव अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिला 22 महिने डांबुन ठेवत तिच्यावर अत्याचार करणार्‍या गोलू रामसिंग राठोड (वय-21, रा. धनवाडा ता. खिडकीया जि.हरदा मध्यप्रदेश ह.मु. समता नगर) या नराधामाला जिल्हा न्यायालयान 20 वर्षे सश्रम कारावास आणि 74 हजाराचा दंडाची शिक्षा सुनावली आहे.

शहरातील समता नगरात राहणारा गोलू रामसिंग राठोड याने अल्पवयीन मुलीला फूल लावून तिला पळवून नेल्याची घटना 16 डिसेंबर 2019 रोजी घडली होती. अल्पवयीन मुलीला फसू लावून पळवून नेत तिला मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी देत तिला तब्बल 22 महिने डांबून ठेवत तिच्यावर जबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आरोपीला श्रीराम राठोड, रामकिसन राठोड, यशोदा राठोड, राजेश चव्हाण सर्व रा. धनवाडा ता. खिडकीया, जि. हरदा, मध्यप्रदेश ह. मु. समता नगर यांनी मदत केली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पीडीतेसह वैद्यकीय अधिकार्‍यांची महत्वपुर्ण साक्ष

या गुन्ह्याचा खटला जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायाधिश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश बी.एस. महाजन यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. या गुन्ह्यात एकुण 11 साक्षीदार तपासण्यात आले. यात अल्पवयीन मुलगी आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. साक्षी पुरव्याअंती आरोपी गोलू रामसिंग राठोड याला दोषी ठरविण्यात आले.

20 वर्ष सश्रम कारावास अन् 74 हजारांचा ठोठावला दंड

सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. चारुलता बोरसे यांनी साक्षीदारांच्या साक्ष नोंदवून घेत प्रभावी युक्तीवाद केला. त्यानुसार न्यायालयाने गोलू राठोड याला दोषी ठरवित त्याला विविध कलमान्वये 20 वर्षे सश्रम कारावास आणि एकुण 74 हजारांचा दंडांची शिक्षा सुनावली. कामकाजात अ‍ॅड. शारदा सोनवणे व पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e