दुध घेवून घरी परत जात असताना ओंकारेश्वर मंदिराच्या बोर्डाजवळ त्यांना एकाने आवाज देत थांबविले. तुमचं लक्ष कुठं आहे, साहेबांकडे चला असे त्याने सांगितले. थोड्या अंतरावर दुचाकीवर बसलेल्या दुसर्या एकाकडे अग्रवाल या गेल्या. तेव्हा त्याने, आता थोड्यावेळापुर्वी चोरी झालेली आहे. तुम्ही सोनं घालुन कसं काय फिरतात, तुम्हाला पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. त्यानंतर त्या दोघांनी अग्रवाल यांना त्यांच्या गळ्यातील सोन्याची 14 ग्रॅम वजनाची पोत, हातातील 9 ग्रॅम वजनाच्या 3 अंगठ्या काढायला सांगितल्या.
पोत व अंगठ्या दोघांनी घेतल्यानंतर एक कोरा कागद अग्रवाल यांना दाखविला आणि त्याच्यावर सही करायला सांगितली. सही करत असतानाच हातचलाखीने एका कागदात पोत आणि आणि तो कागद गोळा करुन त्यांनी सौ.अग्रवाल यांच्या साडीच्या पदराला बांधला. त्यानंतर दोघे निघून गेले. त्यानंतर थोड्या अंतरावर गेल्यानंतर सविता अग्रवाल यांनी पदराची गाठ सोडली असता त्यांना त्यात एक कागद गुंडाळलेला दिसला, तो उघडून पाहिला असता त्यात दुसरीच पोत आढळून आली. तसेच अंगठ्याही नव्हत्या, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अग्रवाल यांनी पती मनोज अग्रवाल यांना शहर पोलिसात धाव घेत आपबीती सांगितली.
0 Comments