अल्पवयीन मुलींचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून धर्मांतर व निकाह केल्याप्रकरणी काल पोलिसांनी आणखी दोघांना मालेगावातून जेरबंद केले आहे. या दोघांना काल पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांना 10 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 6 आरोपी झाले असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी दिली.
शहरातील इमरान कुरेशी याचे दोन साथीदार पप्पू गोरे व सचिन पगारे, रा-वॉर्ड नंबर -2,श्रीरामपूर यांना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने काल शुक्रवारी पहाटे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात धरले व श्रीरामपूरला आणण्यात आले आहे.
मुल्ला कटरचे श्रीरामपूर येथील आणखी दोन साथीदार मालेगावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे व त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी गौतम लगड, रमेश गावडे, रमिझ अख्तार या पोलिसांनी मालेगावात जावून पप्पू गोरे व सचिन पगारे, (रा. वॉर्ड नंबर 2, श्रीरामपूर) या दोघांना ताब्यात घेवून काल श्रीरामपूर शहरत आणले. काल त्यांना अटक करुन पोलिसांनी या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी 10 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
0 Comments