याबाबत सविस्तर माहिती अशी जमदा येथे वास्तव्यास असलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस तालुक्यातील भऊर येथील २० वर्षीय तरुणाने फूस लावून पळवून नेले. व मेहुणबारे येथील कपाशीच्या शेतात घेवून जावून रात्रीच्या वेळी तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच याबाबत कोणाला काही एक सांगू नये म्हणून तिला विष पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला मुलीच्या भावाच्या फिर्यादीवरुन तरुणाविरोधात भादवी कलम ३७६. ३७३(२) (एन) (२)(जे), ३०७, ५०६ आणि लैगीक गुन्हापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४,३(ए), ४, ५,(एल)(आर) ६ आदि कलन्वय गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उप.निरिक्षक प्रकाश चव्हाण हे करीत आहेत.
0 Comments