पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात जामीन मिळवण्यासाठी मयत व्यक्तीच्या जागी दुसरा व्यक्ती उभा करून जामीन मिळवीत न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर राजेंद्र हिरावत (२५रा. हिरावत चाळ, सुदर्शन कॉलनी, दत्तनगर, पेठ रोड, पंचवटी, नाशिक) याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याने न्यायालयातून जामीन मिळवण्याकरिता गणपत विकास जाधव (रा. गंगापूर गाव) यांचा सातबारा उतारा मिळविला होता मात्र जाधव हे २ डिसेंबर २०१४ रोजी मयत झाले होते, मात्र त्यांच्या जागी दुसरा अनोळखी व्यक्ती उभा करून त्यांच्या नावाचा सातबारा उतारा, आधार कार्ड १५ डिसेंबर २०२० ला न्यायालयात दाखवून स्वतःचा जामीन करून घेऊन न्यायालयाची फसवणूक केली.
म्हणून याचे सह जामीनासाठी उभा राहिलेल्या अनोळखी व्यक्तीवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी पाटील करीत आहेत
0 Comments