लातूर शहरातील वैशाली इडली गृह येथे गर्दी झालेली होती. त्याठिकाणी एक युवक विद्युत तारेला धरुन खाली उडी मारण्याचा प्रयत्न करीत होता. तो विद्युत खांबावर चढत असतानाच लोकांनी विद्युत विभागास फोन करून लाईट बंद करण्यास सांगितले होते. मात्र त्याने वरुन उडी मारली यामुळे त्याच्या कमरेला मार लागला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णलयात त्याला सिटीस्कॅन करण्यासाठी घेऊन गेले असता तो लघुशंकेच्या बहाण्याने बाथरुममध्ये गेला. तिथे त्याने बाथरुमच्या खिडकीची काच काढून घेत स्वतःवर काचेने वार करून केले. त्याला पुन्हा तिथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. विनोद माने यास तीन मुली होत्या. चौथ्या वेळी त्याला मुलगा झाला. परंतु, पत्नीचे सिझेरीयन झाल्याने दवाखान्याचा खर्च कसा करायचा. या कारणाने त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
0 Comments