धडगाव येथे घाटात दरड कोसळून बकऱ्या चारणाऱ्या तरूणाचा मृत्यू

नंदुरबार : सातपुड्यातील धडगाव तालुक्यातील अस्तंबा परिसरातील नकट्यादेव घाटात अचानक दरड कोसळली. यावेळी बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या २७ वर्षीय केशव बिंद्या वळवी ‍याचा मृत्‍यू  झाला 
बकऱ्या चारत असताना उंच माथ्‍यावरून डोक्‍यात दगड कोसळत असल्‍याचे केशव वळवी याच्‍या लक्षात आले. यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी पळत असताना अंगावर दरड कोसळल्याने डोक्याला मोठा मार लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत गावकरी यांच्या मदतीने त्यांचा मृतदेह डोंगरातून गावी आणण्यात आला. धडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे.

तात्‍काळ मदत न मिळाल्‍याने मृत्‍यू

डोक्यावर दरडीतील दगड कोसळून बेशुद्ध झाल्यानंतर मोठा रक्तस्राव झाला तत्काळ मदत मिळू शकली नसल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e