नाशिक शहर व नाशिकरोड परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीचे प्रणाम मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोटरसायकल चोरांना आळा बसावां म्हणून पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार नाशिकरोड पोलिसांनी शोध मोहीम केली असता दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत...
नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस कर्मचारी विशाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी योगेश हिरामण जाधव राहणार अशोक नगर सातपूर व आदित्य शैलेश पालवे राहणार सिडको नाशिक यांच्याकडून नाशिकरोड व इंदिरानगर परिसरांमधून चोरी झालेल्या तीन मोटरसायकल हस्तगत केल्या.
तसेच मोटरसायकल प्रतिबंधक पथक व नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने गेल्या चार महिन्यांमध्ये दोन विधी संघर्ष बालक व १७ आरोपींना आतापर्यंत अटक करून त्यांच्याकडून २३ लाख वीस हजार रुपये किमतीच्या ६९ मोटरसायकल जप्त केल्या आहेत.
दरम्यान, सदरची उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे उपायुक्त विजय खरात सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ आदींनी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, राजू पाचोरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे गुन्हे शोध पथकातील हवालदार अनिल शिंदे, सुभाष घेगडमल, अविनाश जुंद्रे, विष्णू गोसावी, राकेश बोडके, केतन कोकाटे, सोमनाथ वाजे, विशाल वर, महेंद्र जाधव, योगेश रानडे, विनोद लखन, विशाल पाटील, मनोहर शिंदे, अजय देशमुख, स्वप्निल जुंद्रे, सचिन रामराजे, यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments