पतीचा मोबाईल सर्चिंग केला अन्‌ नको ते दिसले; धक्‍कादायक सत्‍य बाहेर आल्‍याने पोलिसात धाव

जळगाव : लग्नाला वर्ष उलटत नाही, तोवर पतीचा धक्‍कादायक कारनामा समोर आला आहे. बायकोने पतीचा मोबाईल सहज सर्च केला. तर त्यात पहिल्‍या पत्नीसोबत गोडवा कायम असल्याची खात्री झाली. पहिली पत्नी असताना तरुणाने दुसरीशी संसार थाटल्याचा प्रकार उघडकीस आला. सदर प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. पती व सासरच्या मंडळींसह मध्यस्थी करणाऱ्यां‍विरुद्ध फसवणूक व अत्याचार केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे 
जळगाव शहरातील जीवननगरात राहणारा सत्यजित रवींद्र सोनवणे याचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट होऊन त्याचा भाग्यश्री यांच्याशी विवाह झाला. लग्न ठरविण्यासाठी सत्यजित सोनवणेचे वडील रवींद्र चिंधू सोनवणे, आई उषा सोनवणे, बहीण दीपाली सुधीर शिंदे, किरण अशोक यशवंद, सुदर्शन वाल्हे आदी मंडळींनी पुढाकार घेतला होता. त्यांनी सत्यजितचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाल्याचे सांगून त्याचा दुसरा विवाह झाला नसल्याची हमी सुशील बागूल यांच्यासमक्ष दिली होती.

मे २०२१ मध्‍ये झाला विवाह

त्यानंतर ठरल्याप्रमाणे दोघांचा विवाह २२ मे २०२१ ला झाला होता. लग्नानंतर पतीच्या वागणुकीवर शंका आल्याने सहज एकदा मोबाईल खेळत असताना पत्नीला नको ते आढळून आले. पती सत्यजित याच्या मोबाईलमध्ये एका महिलेसोबत लग्नाचे फोटो दिसले. त्यांनी पतीला याबाबत विचारणा केली; परंतु त्याने विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करीत हे फोटो खोटे असल्याचे सांगितले. त्यानंतर विवाहितेने माहेरच्यांना बोलावून घेत सासरच्यांना जाब विचारला. या वेळी त्यांच्याकडून विवाहितेच्या माहेरच्यांनादेखील मारहाण करण्यात आली.

फसवणुकीचा गुन्हा दाखल

मारहाणीच्या घटनेनंतर ८ सप्टेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच विवाहावेळी वडिलांनी १५ ग्रॅमची चेन, १० ग्रॅमचे कानातले टोंगल व पतीला पाच ग्रॅमची अंगठी असे दिले होते; परंतु सासरच्यांनी एक महिना चांगली वागणूक दिली. त्यानंतर त्यांच्याकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. पतीची पहिली पत्नी असल्याचे माहिती असून, त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा दुसरा विवाह करीत विवाहितेची फसवणूक केल्याप्रकरणी सत्यजित सोनवणे, त्याचे वडील रवींद्र सोनवणे, आई उषा (तिघे रा. जीवननगर, जळगाव), बहीण दीपाली सुधीर शिंदे (रा. शांतीनगर), किरण यशवंद (उल्हासनगर), सुदर्शन वाल्हे (रा. सत्यम पार्क, शिवाजीनगर) यांच्याविरुद्ध फसवणूक व विवाहितेच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e