एकनाथ खडसे यांचे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यासोबतच राजकीय वैर हे कुणापासून लपलेलं नाही. मात्र आता एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांना सोबत बसून जे काही असेल ते मिटवून टाकू, जाऊ द्या, अशी ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केला.
याप्रसंगी एकनाथ खडसे यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याचा केलेला प्रयत्न, त्यांचे भाजपमधील प्रवेशाचे कथित प्रयत्न आदींबाबतही महाजन यांनी चाळीसगावात पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
एकनाथ खडसे आणि खासदार रक्षा खडसे अमित शाह यांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र बराच वेळ वाट पाहिल्यानंतर अमित शाह यांनी भेट नाकारल्याचं स्वत: रक्षा खडसे यांनी सांगितल्याचं गिरीष महाजनांना सांगितलं.
एकनाथ खडसेंच स्पष्टीकरण
एकनाथ खडसे यांनी गिरीष महाजनांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देतांना म्हटलं की, एका कार्यक्रमानिमित्त आम्ही तिघे एकत्र होतो. देवेंद्र फडणवीसांना भेटायचं असं मी म्हटलं होतं याशिवाय कुठल्याही विषयावर चर्चा झाली नव्हती.
फडणवीसांना भेटायचं होतं हे बोललो होतो, मात्र मिटवायचं वैगेरे असं काहीही बोललो नव्हतो. असंच काही करायचं असतं तर मी थेट जाहीरपणे बोललो असतो. मात्र मला भाजपमध्ये जाण्यात रस नाही, असं खडसे यांनी म्हटलं.
0 Comments