विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकविल्याने पोलीस काँस्टेबलची आत्महत्या ! सहायक पोलीस निरीक्षक (API), सहाय्यक फौजदार (ASI), महिला पोलिसासह (LPC) चौघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर :   महिलेचा विनयभंग  केल्याचा खोटा गुन्हा दाखल करुन त्रास दिल्याने व हे प्रकरण मिटविण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी  केली. ते देण्यासाठी दबाव आणत असल्याने एका पोलीस काँस्टेबलने आपल्याकडील रायफलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या  केली. या घटनेत राजूर पोलीस ठाण्याचे इन्चार्ज सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक साबळे, सहायक फौजदार निमसे महिला पोलीस काँस्टेबल (सर्व नेमणुक राजूर पोलीस ठाणे, ता. अकोले) आणि भाऊसाहेब शिवाजी फुंदे  (नेमणूक पोलीस मुख्यालय, अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत 
भाऊसाहेब दगडु आघाव  (वय ४९, रा. नवीन गावठाण, बारागाव, नांदूर) असे आत्महत्या केलेल्या पोलीस काँस्टेबलचे नाव आहे. ते सध्या अहमदनगर मुख्यालयात नेमणूकीला होते. मुळा धरण येथील पोलीस चौकीत कार्यरत असताना शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी  लिहिली होती
याबाबतची माहिती अशी, अकोले तालुक्यातील  राजूर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना एका महिला कर्मचार्‍याने भाऊसाहेब आघाव यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर त्यांची नेमणूक मुख्यालयात झाली होती. मागील गुन्ह्याचे प्रकरण मिटविण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक साबळे यांनी १० लाख रुपये, तर या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस कर्मचारी फुंदे याने १ लाख रुपये मागितले होते. त्यासाठी ते आघाव यांच्यावर दबाव आणत होते. भाऊसाहेब आघाव हे मुळा धरण येथील प्रवेशद्वारालगतच्या पोलीस चौकीत कार्यरत होते. ते नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी ८ वाजता चौकीत हजर झाले. त्यांच्यासमवेत असलेले हवालदार संजय जाधव व पाटबंधारे विभागाचे कर्मचारी रामभाऊ बाचकर हे बाहेर गेल्याचे पाहून त्यांनी चौकीचे दार आतून बंद केले. त्यानंतर आघाव यांनी रायफलमधून गोळी झाडली. हा आवाज ऐकून कर्मचार्‍यांनी धाव घेतली. आघाव रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्याकडे एक चिठ्ठी आढळून आली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनोज पाटील 
व इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली
ठसेतज्ञ पोलीस निरीक्षक माधुरी मदने  व त्यांच्या पथकाने निरीक्षक केले.
आघाव यांचे मोबाईल, बॅग रिव्हॉल्व्हर पोलिसांनी ताब्यात घेतले.

आघाव यांच्या नातेवाईकांनी मनोज पाटील यांची भेट घेऊन जोपर्यंत आत्महत्येस कारणीभूत असणार्‍यांवर कारवाई होणार नाही,
तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेतला.
आघाव यांची दोन्ही मुले व ग्रामस्थ सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या देऊन होते.
त्यानंतर सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी पोलिसांनी फिर्याद दाखल केली.

आघाव यांचा मुलगा प्रेमकुमार आढाव यांने फिर्यादी दिली असून त्यानुसार
सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
राजूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्याचे प्रकरण मिटविण्यासाठी सहायक निरीक्षक साबळे
याने १० लाख रुपयांची मागणी केली होती. फुंदे हा साबळे सांगतील त्याप्रमाणे करा
असे म्हणून दबाव आणत होता. त्या त्रासाला कंटाळून आघाव यांनी आत्महत्या  

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e