दसऱ्यासाठी मुलाला घरी घेऊन जाताना अपघात; आई– वडीलांसह मुलगा गंभीर जखमी

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील श्रावणी येथील नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या  विद्यार्थ्यांला आई- वडील घरी घेऊन जात होती. या दरम्‍यान निंबोणी गावाजवळ त्‍यांच्‍या वाहनाला झालेल्या अपघातात विद्यार्थ्यासह त्याचे आई- वडील गंभीर जखमी झाले   
विसरवाडी– नंदुरबार रस्त्यावर निंबोणीनजीक डंपर व जीप यांच्यात हा अपघात झाला. नवापूर  तालुक्यातील निंबोणी गावानजीक वळणावर सोनगीरहून सुरतकडे जाणारा डंपर आणि श्रावणीहून नंदुरबारच्या दिशेने जाणारी जीप यांच्यात हा अपघात झाला. डंपरने धडक दिलेल्या भीषण अपघातात जीपची एक साईड पूर्णता दाबली गेली.

जखमी रूग्णालयात दाखल

अपघातात रागिनी नायकर (वय ४०), शिवकुमार नायकर (वय ४५) व मुलगा हर्षल नायकर (वय १५) सर्व रा. नंदुरबार हे तिघे जखमी झाले आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात खांडबारा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या मार्गावरील हा आठवडाभरातील तिसरा अपघात आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e