मुलाने प्रेमविवाह केल्याने पित्यावर चाकूने वार, तिघांवर गुन्हा

मुलाने प्रेमविवाह  केल्याच्या रागातून पित्याला  मारहाण  करीत चाकूने वार  करीत जखमी  केले. याप्रकरणी तिघांवर तालुका पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

संतोष मेहताब राठोड (वय 52 रा. मोरशेवडी ता. धुळे) असे जखमी पित्याचे नाव आहे. त्यांच्या मुलाने गावातील त्यांच्याच समाजातील मुलीशी प्रेमविवाह करुन कोणास काही एक न सांगता परस्पर लग्न लावून घेतले.

त्या कारणावरुन दि. 23 रोजी सायंकाळी राठोड यांना त्यांच्या घरासमोर गावातील अविनाश राजेंद्र राठोड, योगेश राजेंद्र राठोड व राजेंद्र सदा राठोड यांनी हाताबक्यांनी मारहाण केली. तसेच पाठीला चाकु मारुन दुखापत करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. म्हणुन वरील तिघांवर गुन्हा दाखल झाला असून पुढी तपास असई जाधव करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e