पालघरमध्ये मोठी दुर्घटना! केमिकल कंपनीत भीषण स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू, अनेक जखमी

राज्यात एकीकडे दिवाळीचा सण आनंदात साजरा केला जात असताना, दुसरीकडे पालघर जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली. पालघरमधील बोईसर तारापूर एमआयडीसीत भघेरिया केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू, तर १० हून अधिक कामगार जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 
स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू आहे. या भीषण स्फोटात जखमी झालेल्या कामगारांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, भघेरिया केमिकल कंपनीत उत्पादन सुरू असताना, अचानक कंपनीतील बॉयलरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की यामुळे जवळपासचा संपूर्ण परिसर हादरवून गेला

दरम्यान, स्फोटाची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्फोटात जखमी झालेल्या कामगारांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

 या स्फोटानंतर कंपनीत गॅस गळती देखील सुरू असून कोणालाही जवळ जाण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ऐन दिवाळीच्या सणात स्फोटामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e