तालुक्यातील महत्वाची समजली जाणार्या जऊळके-दिंडोरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भारती तुकाराम जोंधळे यांची सरपंचपदी जनतेतून निवड झाली होती.
काल उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत पती तुकाराम हिरामण जोंधळे यांची निवड झाली. परीसरातुन पत्नी सरपंच व पती उपसरपंच पदासाठी निवड झाल्याचा प्रथमच योग आला असल्याचे जोंधळे दाम्पत्याचा विशेष कौतुक होत आहे. जऊळके-दिंडोरी येथील उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी तुकाराम हिरामण जोंधळे व कुणाल प्रकाश बागुल हे दोन अर्ज प्राप्त झाल्यानंतर माघारीच्या मुदतीत माघार न झाल्याने निवडणूक घेण्यात आली
यात तुकाराम जोंधळे यांनी सहा तर कुणाल बागुल यांना पाच मते मिळाल्याने तुकाराम जोंधळे यांना विजयी घोषित करून उपसरपंचपदी त्यांची निवड झाल्याचे निवडणुकीनिर्णय अधिकार्यांनी जाहिर केले. यावेळी निवडणुक निरीक्षण अधिकारी परदेशी, चिटणीस हिरालाल पाटील, अध्याशा अधिकारी सरपंच भारती जोंधळे यांनी काम बघितले.
0 Comments