याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांना येथील एकलहरे रोडवर हॉटेल वैभवच्या पाठीमागे दोघेजण एका चारचाकी गाडीत अंमली पदार्थ घेऊन आले असून ते विकण्यासाठी आणले आहेत, अशी गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पलीस निरीक्षक गणेश नायदे यांना दिली.
यानंतर त्यांनी याबाबत पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे व त्यांच्या सहकाऱ्यांना सांगून माहिती देत कारवाई करण्याची सूचना दिली. त्यानंतर स्वतः योगेश पाटील उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे व त्यांचे सहकारी सदर ठिकाणी गेले असता त्यांना हॉटेल वैभवच्या पाठीमागे एम.एच.१५ एफ. टी. ५०३५ या चारचाकी वाहनात दोघे जण बसल्याचे दिसले.
त्यावेळी त्यांनी या दोघांची चौकशी करून तपासणी केली असता एका जवळ एका प्लॅस्टिकच्या पिशवीत १८.२७ ग्रॅम एमडी नावाचे अंमली पदार्थ आढळून आले. या अंमली पदार्थांची किंमत सुमारे तीन लाख ६५ हजार चारशे रुपये इतकी असून गाडीची किंमत पाच लाख रुपये आहे. तसेच चौकशीत या दोघांची नावे विचारली असता राहुल संदीप सोनवणे राहणार. फर्नाडिस वाडी, जय भवानी रोड, नाशिकरोड, व शैलेश गोपीचंद तेलोरे राहणार. कळवा, जि.ठाणे असे असल्याचे सांगितले.
दरम्यान, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी या दोघांविरुद्ध अंमली पदार्थ, औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ एन डी पी एस ऍक्टचे कलम १८ क २१ ब प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
0 Comments