कळमसरे येथे मायलेकीची आत्महत्या; विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

अमळनेर (् अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे आईसह मुलीने आत्महत्या  केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
नीम येथील समाधान जहाँगीर कोळी यांची पत्नी जयश्री समाधान कोळी (वय ३०) व मुलगी नंदिनी समाधान कोळी (वय ८) यांनी कळमसरे  शिवारात वीज उपकेंद्रासमोरील नीम रस्त्याला लागून असलेल्या भाकचंद जैन यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या  केली. जयश्री कोळी या तीनच्या सुमारास कळमसरे बसस्थानकावर मुलीला घेऊन बसल्या होत्या. मुलीला बिस्कीट व पाण्याची बाटली घेऊन पायी नीम गावाकडे रस्त्याकडे निघाल्या होत्या. दोघींच्या पायात चप्पलही नव्हती. कळमसरे गावापासून एक किलोमीटर अंतरावरील विहिरीत उडी मारून या दोघींनी जीवनयात्रा संपविली.

सासू गेल्‍या होत्‍या देवदर्शनाला

दरम्यान, जयश्री कोळीला अजून एक चार वर्षाचा मुलगा आहे, तो जयश्री यांच्या माहेरी मामाकडे जैनाबाद (जळगाव) येथे शाळेत शिकतो. जयश्रीचा पती समाधान जहाँगीर कोळी हा रोजंदारीने दुसऱ्याकडे मोलमजुरी करतो. जयश्रीची सासू हिराबाई कोळी सप्तशृंगी गडावर मंगळवारी देवदर्शनासाठी गेलेली होती. दरम्यान, जयश्री व मुलगी नंदिनीचा मृतदेह विच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून, मारवड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश साळुंखे तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e