सावकारांच्या जाचामुळे तरुणाची आत्महत्या

धुळे : कुटुंबावर काही संकटे, पत्नी गर्भवती असतानाही सावकारांच्या जाचामुळे सौरभ दिलीप अमृते या तरुणाने एक ऑक्टोबरला  आत्महत्या केली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असली तरी आझादनगर पोलिस ठाण्याच्या तपासाकडे धुळेकरांचे  लक्ष लागून आहे.
व्यावसायिक अमृते कुटुंबावर काही वर्षांत अनेक संकटे कोसळली. तरीही न डगमगता ते पायावर उभे राहिले. या कालावधीत सौरभ याने काही सावकारांकडून पैसे घेतले. त्याने व्याजासह मुद्दल फेडूनही सावकारांचा जाच कमी होत नव्हता. ते सौरभ याच्याकडे पैशांची मागणी करत होते. सौरभने चारपटीने पैसे फेडल्याची चर्चा लपून राहिलेली नाही. तरीही सावकारांनी सौरभच्या घरात प्रवेश करून त्याला गर्भवती पत्नीसमोर शिवीगाळ केली. धमकी दिली. अर्व्याच्य, बीभत्स भाषेत सौरभचा पाणउतारा केला.

दहा ते बारा सावकारांचा पाश

काही राजकीय मंडळींनी सावकार व सौरभमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, सावकारांचा जाच थांबणार नाही या भीतीतून त्याने आत्महत्या केली. त्याचा वर्षापूर्वीच विवाह झाला होता. या घटनेमुळे सौरभचे कुटुंबीय धास्तावलेले आहेत. सरासरी दहा ते बारा सावकारांच्या पाशात सौरभ अडकलेला होता. यासंदर्भात आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील म्हणाले, की सौरभने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिलेली नाही. तसेच त्याच्या मृत्यूस सावकार कारणीभूत असून त्यातील काही व्यक्तींवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. यासह चिठ्ठीबाबत वस्तुस्थिती तपासातून पुढे येईल. मात्र, सौरभ अमृते या तरुणाच्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली असून सावकारी क्षेत्राचे धाबे दणाणले आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e