लता गोरख खोकराळे (वय 29 वर्षे) ही विवाहित महिला शिर्डी पोलीस ठाण्यास नियुक्तीस होती. मात्र, सध्या ती रजेवर होती आणि तळेगाव दिघे येथे माहेरी आई-वडिलांकडे राहत होती. दरम्यान मंगळवारी (दि. 18) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घरात कुणीही नव्हते. पोलीस असलेल्या लता खोकराळे हिने पत्र्याच्या छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. आई - वडील गावातून सायंकाळी घरी आल्यावर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर लता खोकराळे हिला तातडीने घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता. याप्रकरणी गोरख बाबुराव खोकराळे (वय 65 वर्षे, रा. तळेगाव दिघे) यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील तसेच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तळेगाव दिघे (खोकराळे वस्ती) याठिकाणी शोकाकुल वातावरण मयत लता खोकराळे हिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 Comments