मिळालेल्या माहितीनुसार, बहिणीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या कारणावरून मुलीच्या भावाने प्रियकर विशाल रमेश लव्हाळे याचा निर्घुण हत्या केली आहे. तर या प्रकरणी मुख्य आरोपी कृष्णा दिगंबर पवार (चिंचोली, ता. खुलताबाद) याला अटक केली आहे. सदर घटनेने जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील टापरगावात खळबळ उडाली आहे.
विशाल रमेश लव्हाळे याचे गावातील कृष्णा पवार याच्या बहिणीसोबत प्रेम संबंध होते. कृष्णाला याची माहिती समजताच त्याला विशालचा भरपूर राग आला. त्यांने आपल्या वडिलांच्या मोबाईलवरून विशालला फोन करून बोलवून घेतले. यानंतर विशालला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यात विशाल गंभीर जखमी झाला. घरी आल्यानंतर तो जागेवरच कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिसांनी आरोपी कृष्णा पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
0 Comments