धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या; अहमदनगरमध्ये खळबळ

अहमदनगर जिल्ह्यातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. मुळा धरणाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस चौकीवर कार्यरत असलेल्या एका पोलीस  कर्मचाऱ्याने सर्व्हिस रायफलमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भाऊसाहेब दगडू आघाव (वय ४९, रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे 
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव हे मुळा धरणाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस चौकीवर कार्यरत होते. त्यांनी आज, शनिवारी सकाळी पावणे दहा वाजता मुळा धरणाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस चौकीत आतून दरवाजा बंद करून पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव यांनी सर्व्हिस रायफल मधून स्वतःवर गोळी झाडून घेतली.त्यामुळे ते जागीच ठार झाले. या घटनेने मुळा धरणाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस चौकीत एकच खळबल उडाली. पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
भाऊसाहेब आघाव यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजले नाही. सदर घटनेची माहिती समजताच राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, तहसीलदार फसियोद्दीन शेख, जलसंपदा खात्याचे उप अभियंता शरद कांबळे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज घटनास्थळी रवाना झाले आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e