मैत्रीणीला मारहाण प्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल..

औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात त्यांच्यासोबत राहत असलेल्या मैत्रीण ईशा झा यांनीच मारहाण केल्याची तक्रार कन्नड पोलिसांत दाखल केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईशा झा यांनी एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायलर केला असून यात जाधव यांच्याकडून आपल्याला मारहाण झाल्याचे तसेच वारंवार संशय घेऊन छळ केल्याचे म्हटले आहे. हर्षवर्धन जाधव आणि ईशा झा हे गेल्या अनेक महिन्यांपासून सोबत राहतात. कन्नड मतदारसंघातील अनेक कार्यक्रम आणि आंदोलनात देखील जाधव यांच्यासोबत ईशा झा वावरतांना अनेकदा दिसल्या.

पंरतु नुकतीच ईशा झा यांनी हर्षवर्धन जाधव यांच्याकडून आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार कन्नड शहर पोलिसांत दाखल केली आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ देखील ईशा झा यांनी सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. यात ईशा यांनी हर्षवर्धन यांनी आपल्याला केस पकडून मारहाण केली, मुक्का मार दिल्याचे म्हटले आहे.

हर्षवर्धन जाधव हे सातत्याने आपल्यावर संशय घेतात, कुठल्याही व्यक्तीशी आपला संबंध जोडून त्रास देतात. घरातील एका मुलाशीच आपला संबंध जोडत त्यांनी मारहाण केली. अनेक दिवसांपासून हे प्रकार सुरू आहेत. परंतु त्यांच्यात बदल होईल या अपेक्षेने मी सगळं सहन करत होते. पण आता सहनशिलतेच्या बाहेर गेले असून आपण कन्नड सोडून जात आहोत.

मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे, त्याचे काय होईल हे माहित नाही. पण आता आपण पुन्हा कन्नडमध्ये परतणार नाहीत, असेही ईशा झा यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यामुळे हर्षवर्धन जाधव हे पुन्हा अडचणीत आले आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e