सवाईमुकटीत तलावात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू

शिंदखेडा तालुक्यातील सवाई-मुकटी गाव शिवारातील तलावातबुडून पिता-पुत्राचा  मृत्यू  झाला आहे. ही दुर्देवी घटना काल दि.21 रोजी सकाळी घडली. तलावात पाणी पिण्यासाठी गेलेल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडीलही गाळाता फसल्याने दोघांचा बुडून मृत्यू  झाला. याबाबत शिंदखेडा पोलिसात नोंद झाली आहे.

मच्छींद्र उत्तम सोनवणे (वय 52) व आनंदा मच्छींद्र सोनवणे (वय 20) असे मयत पिता-पुत्राचे नाव आहे. दोघे काल सकाळी सवाई - मुकटी गावशिवारात मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. सकाळी दहा वाजेच्या सुमारास आनंद हा तलावात पाणी पिण्यासाठी गेला असता तो परत का आला नाही म्हणून वडील मच्छींद्र सोनवणे त्याला पाहण्यासाठी गेले.

तेव्हा आनंदा यांची चप्पल तलावाचा शेजारी आढळल्याने वडील मच्छींद्र यांनी पाण्यात उडी घेत त्याचा शोध घेत असताना ते ही गाळात फसल्याने त्याचा ही बुडून मृत्यू झाला. दोघांना ग्रामस्थांनी तलावा बाहेर काढून खासगी वाहनाने शिंदखेडा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ कुंदन वाघ यांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिंदखेडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रविंद्र केदार, उपनिरीक्षक मिलिंद पवार, पोलिस नाईक प्रशांत पवार, नरेश पवार, पोलिस कर्मचारी विनोद बर्डे, पकंज कुलकर्णी घटनास्थळी भेट दिली.

याबाबत मच्छींद्र सोनवणे यांचे शालक संजय बाबूराव नगराळे (वय 50) यांच्या माहितीवरून शिंदखेडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक प्रशांत पवार करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e