शहादा वडगाव, जावदामार्गे मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या भमराटा नाकाकडे अवैधरित्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती म्हसावद पोलिसाना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी तत्काळ सापळा रचून जावदा त.ह. गावातील गावठाणच्या मोकळी जागेवर अवैध दारू वाहतूक करणारी पिकअप वाहन थांबवुन तपासणी केली. त्यात सुमारे दोनशे बियरचे बॉक्स आढळून आले. त्याची किंमत पाच लाख २८ हजार मिळून आली.
चालकही ताब्यात
म्हसावद पोलीस ठाण्यात वाहन त्याची किंमत सुमारे पाच लाख असा एकूण दहा लाख २८ हजार किंमतीचा माल जप्त करण्यात आला. दारूची वाहतूक करणारा कोमलसिंग तारसिंग भील (रा. पळासनेर ता. शिरपूर) याला अटक करण्यात आली असून ही कारवाई म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, घनश्याम सुर्यवंशी, अजित गावित राकेश पावरा, उमेश पावरा यांनी केली पुढील तपास पोलीस करीत आहे
0 Comments