बहिणीकडे वाईट नजरेने बघितले म्हणून वाचमनची हत्या

नाशिक : नाशिक शहरात मागील तीन– चार दिवसात दुसरी खूनाची घटना घडली आहे. अगदी शुल्‍लक कारणांवरून या दोन्‍ही घटना घडल्‍या असून, आजच्‍या घटनेत बहिणीकडे वाईट नजरेने बघितल्‍याच्‍या कारणावरून वॉचमनला जीव मारले आहे.
म्हसरूळ येथील वाढणे कॉलनीतील हनुमान मंदीराजवळील बांधकाम साईट येथे प्रकार घडला आहे. बांधकाम साईटवर असलेले वॉचमन व बिगारी यांच्यातील वादातून हत्या  झाली. दारूच्या नशेत बांधकाम साईडवरील बिगारी असलेल्‍या कामगाराने माझ्या बहिणीकडे का बघीतले यावरून बिगारी व वॉचमन यांच्‍यात वाद झाला. या वादात वॉचमनला जीवे मारल्‍याची घटना घडली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तीन दिवसात दुसरी हत्‍या

नाशिकमध्ये शुल्लक कारणावरून तिन दिवसांत दुसरी हत्या झाली आहे. दोन दिवसांपूर्वी 2000 हजार रूपयांसाठी काकाने पुतण्याची हत्या केली होती. तर आज बहिणीकडे वाईट नजरेने बघितल्‍याचे कारण ठरले.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e