दहा हजार रुपयांची मागणी
२ नोव्हेंबरला सुळे येथील कक्षात जाऊन त्यांनी अभियंता समाधान पाटील याच्याकडे ऑनलाइन अर्जाची प्रत व इतर आवश्यक कागदपत्रे सादर केली. समाधान पाटील याने डिमांड नोट काढण्यासाठी वरिष्ठ तंत्रज्ञ निलेश माळी याची भेट घेण्यास सांगितले. त्यानंतर निलेश माळी खंबाळे येथे जाऊन तक्रारदाराला दुकानावर जाऊन भेटला. डिमांड काढण्यासाठी समाधान पाटील यांच्या नावाने त्याने दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दूरध्वनीवरुन तक्रार दिली. विभागाच्या अधिकार्यांनी शिरपूरला येऊन तक्रार नोंदवली.
दोघांविरोधात गुन्हा
तक्रारीची पडताळणी केल्यावर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर दहा हजार रुपयांची लाच स्विकारतांना निलेश माळी याला मुद्देमालासह अटक करण्यात आली. कनिष्ठ अभियंता समाधान पाटील यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार, धुळे येथील उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजीतसिंह चव्हाण, हवालदार राजन कदम, शरद कटके, संतोष पावरा, गायत्री पाटील, संदीप कदम, रामदास बारेला, प्रशांत बागूल, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली.
0 Comments