भरदिवसा विद्यार्थिनीला निर्जनस्थळी पळवून नेत जबरदस्ती

साक्री तालुक्यातील दिघावे येथील धक्कादायक आणि संतापजनक अशी घटना उघडकीस आली आहे. गावातील अल्पवयीन मुलीला धमकी देवून दोघांनी दुचाकीवरून पळवून नेत निर्जनस्थळी नेवून एकाने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोघांवर साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर घाबरून गेलेल्या पिडीत मुलीने आईसह काल पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार, पिडीता ही दिघावे चौफुली येथील सागर पानपाटील याच्या गॅरेजजवळून जात असतांना गावातील राजेंद्र बापु पानपाटील आणि भैय्या भटु पानपाटील हे दोघे आले.
दोघांनी तिचा हात पकडून तुझ्या भावाला आणि आई-वडीलांना मारून टाकेल, अशी धमकी देवून तिला दुचाकीवर बसविले. तेथून नांदीनकडे घेवुन जात असतांना दुचाकीवर मागे बसलेला भैय्या पानपाटील याने तिचा विनयभंग केला. त्यादरम्यान राजेंद्र याला कोणाचा तरी फोन आल्याने त्याने भैय्या याला रस्त्यात उतरवून दिले.

त्यानंतर राजेंद्र याने पिडीतेला जायखेडा गावाच्या दिशेने नेतांना एका निर्जनस्थळी गाडी थांबवून तिला झाडाझुडपात नेले. तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा त्याला भैय्या पानपाटील याचा फोन आला की, पिडीतेचा गावात शोध सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे घाबरून राजेंद्र याने पिडीतेला पुन्हा दुचाकीवर बसवून दिघावेतील मारूती मंदिराजवळ सोडून पळून गेला.

याप्रकरणी दोघांवर भांदवि कलम 363, 354 व पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निकम हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e