अन् टवाळखोराने पकडला तरुणीचा पाय
विद्यार्थिनी बसमध्ये चढल्यानंतर एका विद्यार्थिनी ही दुसर्या मैत्रीणीजवळ बसण्यासाठी जात होती. याचवेळी दीपक सपकाळे हा त्या विद्यार्थिनीचा रस्ता आडवू लागला. त्यानंतर बसमध्ये खाली बसवून विद्यार्थिनीशी त्याने वाद देखील घातला. दरम्यान, ती विद्यार्थिनी मैत्रीणीजवळ बसण्यासाठी जात असताना दीपक याने थेट त्या विद्यार्थिनीचा पायच पकडला. मात्र, त्या विद्यार्थिनीने त्या टवाळखोराच्या हाताला झटका देवून आपली सुटका करुन घेतली.
बस स्टॉपवर दोघांची धुलाई
बस असोदा बसस्टॉपवर पोहचण्याआधीच विद्यार्थिनीचे कुटुंबिय उभे होते. दरम्यान, बस सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास बसस्टॉपवर आल्यावर विद्यार्थिनींनी संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यांच्या कुटुंबीयांनी दीपक व मोहित यांना मुलींची छेड का काढली याचा जाब विचारल्यावर दोघांनी त्यांनाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते दोघ तेथून निघून गेले. हा प्रकार काही नागरिकांना कळाल्यानंतर त्यांनी दीपक, मोहित यांना शोधून दोघांची येथेच्छ धुलाई करीत त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले.
दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
विद्यार्थिनी तिच्या कुटूंबियांसह जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार रात्री उशिरा दीपक सपकाळे व मोहित सोनवणे यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
तिकीटाचे पैसे द्या म्हणत हुज्जत
बस जैनाबादच्या स्टॉपवर आल्यानंतर वाहकाने टवाळखोरांना मस्ती करु नका नाही तर खाली उतरा असा दम दिला. यावर त्या टवाळखोरांनी आमच्या तिकीटाचे पैसे द्या तरच आम्ही उतरु असे म्हणत त्यांनी वाहकाशी हुज्जत घातली.
बसमधून फेकण्याची धमकी
बस स्थानकातून निघाल्यानंतर काही वेळाने दीपक याने पुन्हा विद्यार्थिनींची छेड काढण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने विद्यार्थिनींना तुमचे नाव व मोबाईल नंबर काय असे विचारू लागला. त्यानंतर त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच हा प्रकार घरच्यांना सांगितला तर जीवेठार मारू तर मोहित याने विद्यार्थिनीला बसच्या बाहेर फेकून देण्याची धमकी दिली. दोन्ही टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून एका विद्यार्थिनीने संपूर्ण हकीकत तिच्या वडीलांना सांगितली.
0 Comments