नववीतील आदिवासी विद्यार्थ्यांची आत्महत्या; दिवाळीच्‍या सुट्या संपल्‍यानंतर गेला होता छात्रालयात

धुळे : साक्री तालुक्यातील छडवेल कोरडे येथील महात्मा ज्योतिबा फुले छत्रालय येथे पंधरा वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साहील दिलीप पाडवी असे या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे साहिल दिलीप पाडवी हा विद्यार्थी नंदुरबार येथील रहिवासी असून तीन दिवसांपूर्वीच दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर तो या छात्रालयामध्ये आला होता. दुपारच्या सुमारास शाळेतून या विद्यार्थ्याने अचानक निघून जात छात्रालयाच्या रूममध्ये आतमधून दरवाजा बंद करत गळफास घेतला असल्याची माहिती समोर आली. याबाबत निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून निजामपूर पोलीस या सर्व घटनेचा तपास करीत आहेत. कुटूंबियांचा आरोप इयत्ता नववीमध्ये साहील हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. त्याने टोकाची भूमिका का घेतली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या संदर्भात त्याच्या कुटुंबीयांनी आक्षेप नोंदवला असून याला सर्वस्वी संबंधित छात्रालय प्रशासन जबाबदार असल्याचा देखील आरोप कुटुंबीयांनी लावला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e