थरकाप उडवणारी घटना! पोटच्या लेकीवरंच बाप, आजोबा अन् चुलत्याकडून ६ वर्षे बलात्कार

देशाला हादरवून सोडणारी दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरण ही घटना ताजी असतानाच पुण्यात मुलगी, नात आणि पुतणी या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पुण्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सख्ख्या वडिलांकडून, आजोबांकडून आणि चुलत्याकडून 6 वर्षांपासून बलात्कार होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातून शिकण्यासाठी पुण्यात आलेल्या मुलीने कॉलेजमध्ये समुपदेशन सुरू असताना ही सर्व आपबिती सांगितली आहे. दरम्यान याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांना अटक केली आहे दरम्यान घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिचे आई वडिल शहरात मोलमजुरी करुन घर चालवतात घरची परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी फिर्यादीला उत्तर प्रदेशातील आपल्या मुळ गावी राहायला पाठविले. 2016 ते 2018 या काळात ही मुलगी साधारण 12 -13 वर्षाची असताना मुळगावी तिच्या चुलत्याने तिला दमदाटी करुन एक वर्षभर तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. याचवेळी तिच्या 70 वर्षांच्या आजोबांनी देखील तिच्याशी शरारिक सबंध ठेवले. एप्रिल 2018 मध्ये ती पुण्यात परतल्यानंतर तिने या अत्याचाराची माहिती चिठ्ठी लिहून वडिलांना कळविली मात्र वडिलांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. गेल्या अनेक वर्षांपासून अत्याचार सहन करत असलेल्या या मुलीने तिच्या कॉलेजमधील एका कार्यक्रमात समुपदेशकापुढे ही सर्व घटना सांगितली. त्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले आहे. त्यानंतर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e