वाळू माफियांची मुजोरी; मंडळ अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

धुळे : वाळू माफियांची दादागिरी नेहमीच पहावयास मिळत आली आहे. यांच्‍यावर अंकुश घालता आलेला नाही. यात शिंदखेडा  तालुक्यातील चिमठाणा येथे वाळू माफियांची मुजोरी पुन्‍हा पहावयास मिळाली असून मंडळ अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला आहे 
नदीतून वाळू चोरीचा प्रकार थांबलेला नाही. प्रशासनाकडून वाळू चोरीवर अंकुश लावण्यासाठी प्रयत्‍न केले जातात. परंतु, हे प्रयत्‍न वाळू माफिया हानून पाडत असतात. याचा प्रत्‍यय अनेकदा पहावयास मिळाला आहे. असाच प्रकार चिमठाणा येथे वाळू माफियांकडून झाला आहे. मंडळ अधिकाऱ्यावर प्राणघातक  हल्ला केल्‍याचा प्रकार आज समोर आला आहे. सूर्यकांत श्रीराम मोरे असे हल्ला झालेल्या मंडळाधिकाऱ्याचे नाव आहे.

पूर्व वैमनस्‍यातून हल्‍ला

मंडळ अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला असून हा हल्‍ला पूर्व वैमनस्यातून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमी झालेले सूर्यकांत मोरे यांना खासगी रुग्णालयात उपचार दाखल केले असून उपचार सुरू आहे. याबाबत शिंदखेडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e