धुळे : धुळ्यात गुंगीकारक औषधांचा साठा आढळून आला आहे. हा साठा आझाद नगर पोलिसांनी जप्त करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
धुळे शहरातील हमाल मापाडी परिसरात एक इसम त्याच्या राहत्या घरात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे गुंगीकारक औषधीची बेकायदेशीर विक्री करीत होता. याबाबतची गुप्त माहिती आझाद नगर पोलीसांना मिळाली होती. पोलिसांनी याबाबत तपास करत छापा टाकला.
४४० बाटल्या जप्त
मिळालेल्या माहितीच्या आधारे हमाल मापाडी परिसरात छापा टाकून गुंगीकारक औषध (कोरेक्स) रेक्सॉन टी सिरप याच्या जवळपास 440 बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या असून या औषधांची चोरटी विक्री करणाऱ्या सौंषयीतास देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, पुढील तपास आझाद नगर पोलीस करीत आहेत.
0 Comments