अडीच लाखात सौदा
आधी मुलाला हस्तगत केले आणि मग पोलिसांच्या समोर जे आले ते काही वेगळेच होते. अपहरण करणारा हा मुले चोरणारे टोळीतील सदस्य असून तो या परिसरात काही दिवसांपासून भाड्याची खोली घेऊन राहत होता. यातील जे दलाल होते, त्यांच्यापर्यंत मुलाला घेऊन गेला. त्या ठिकाणी त्या टोळीतील सदस्यांनी एका जणाला मुलगा पाहिजे होता. त्याला बोलावले आणि अडीच लाखात सौदा केला. हा सौदा एका ऑटो चालकाच्या मार्फत झाला असून यामध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.
तीन जण झाले फरार
तीन जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र तीन जण कुणकुण लागताच पळून गेले. पोलिसांच्या मते आणि त्यांना घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरून ही मुले चोरणारी टोळी मोठी आहे. त्यांनी याआधी सुद्धा अनेक मुल चोरली असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
0 Comments