नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गुन्हे शाखा युनिट क्र. २ च्या पथकाने दोन संशयितांना सापळा रचून अटक करत त्यांच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट क्र. २ चे पोलीस हवालदार गुलाब सोनार यांना गोपनीय माहिती मिळाली कि, दोन व्यक्ती चोरीची मोपेड गाडी विक्री करण्यासाठी वडनेर दुमाला गावाजवळ, येणार आहेत.
याची माहिती सोनार यांनी वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ यांना दिली. यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोपट कारवाळ, सहा. उपनिरीक्षक बेंडकोळी,हवालदार गुलाब सोनार, राजेंद्र घुमरे, विवेकानंद पाठक, चंद्रकात गवळी, संदिप रामराजे, अनिल लोंढे, सुनिल आहेर, विजय वरेंदळ, परमेश्वर दराडे, मधुकर साबळे, पो.ना. अतुल पाटील, विजय बनकर आदींच्या पथकाने सापळा
रचत संशयित दिपक अर्जुन पैठणे, (रा. लहवित, नाशिक), धनंजय विजय पाटील (रा. टिटाणे गांव, जि. धुळे) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेली मोपेड गाडी निमाणी बस स्टँड येथुन ३/४ दिवसांपुर्वी चोरी केल्याचे सांगीतले.
0 Comments