बीडच्या धारूर तालुक्यातील कासार येथे दुर्दैवी घटना घडली. शेतावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलीचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतात कपडे धुण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलीचा विहिरीत पडून दुदैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बीडच्या धारूर तालुक्यातील कासारी येथे घडली. या प्रकरणी दिंद्रुड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली
साक्षी ज्ञानोबा कदम (वय 15) असे मृत मुलीचं नाव आहे. साक्षीचे आई-वडील ऊसतोडणीसाठी बाहेरगावी कारखान्यास गेले होते. त्या दरम्यान ती आपल्या चुलत्याकडे राहत होती.
काल साक्षी शेतात विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास ती विहिरीत पडली. पाय घसरून विहिरीत पडल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. विहीर पाण्याने भरलेली असल्याने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यास अडथळा निर्माण झाला होता.
दरम्यान पोलिसांच्या व गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या घटनेने कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच साक्षीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments