धक्कादायक! बापानेच चिरला ५ वर्षाच्या मुलाची गळा अन् मग...

मालाडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका पित्याने आपल्या ५ वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलगा झोपेत असतानाच घरातील चाकूने बापाने मुलाचा चिरून त्याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरातील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नंदन अधिकारी असे आरोपी पित्याचे नाव आहे. त्याने पत्नीसोबत झालेल्या भांडणाच्या रंगात मुलाची हत्या केली. मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरात ही धक्कदायक घटना घडली आहे. मालवणी पोलिसांनी आरोपी नंदनला ताब्यात घेतले आहे. तर मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपी पत्नी आणि दोन मुलांसह मालवणी परिसरात राहत होता. नंदन हा अंड्यांचा व्यवसाय करत होता.

शनिवारी सकाळीच्या सुमारास आरोपीची पत्नी आपल्या 13 वर्षाच्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेली. मात्र, जेव्हा ती घरी आली तेव्हा तिला घराच्या फरशीवर मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. तिने मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर शेजाऱ्यांनी तिच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती मालवणी पोलिसांना दिली. मुलाची हत्या केल्यानंतर नंदन स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबूली दिली. नंदनने आपल्या मुलाची इतक्या क्रूरतेने हत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दोघा पती पत्नीमध्ये अनेकदा वाद होत होत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान या प्रकरणी मालाडच्या मालवणी पोलिस ठाण्यात नंदन विरोधात ३०२ भादवी कलमांतर्गग गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e