बाळापुर तालुक्यातल्या उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबात बाप-मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी उजेडात आली. दरम्यान या गावात मागील वर्षी 14 ऑगस्ट 2022 रोजी एका 45 वर्षीय बापाने पोटच्याच पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरी लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार आई, भाऊला सांगितल्यास तुला आणि तुझ्या आई, भाऊ यांना देखील जीवे करून टाकेल अशी धमकी दिली. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या शेजारी राहणाऱ्या काकूला हा प्रकार सांगितला असता आईला इथे बोलवण्यात आले अन् उरळ पोलीस ठाणे गाठले. अत्याचार करणाऱ्या 45 वर्षीय बापाविरुद्ध तक्रार दिली आहे.
शिक्षेसोबत दंडही सुनावला
निर्दयी बापाने आपल्याच 15 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. बापाच्या या अत्यंत क्रूर कृत्याला मुलीने वाचा फोडली. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून नराधाम बापाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात बापाच्या कृत्यावर न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच पाच लाख वीस हजार रुपयांचा दंड सुनावला.
0 Comments