कुपवाडा जिल्ह्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेत भारतीय तीन जवान शहीद झाले आहे. या घटनेत गनर सौविक हजरा (२२), लांस नायक मुकेश कुमार (२२), नायक मनोज लक्ष्मण राव गायकवाड (४५) यांचा मृत्यू झाला आहे.
सैन्य दलाच्या प्रवक्त्याने माच्छिल सेक्टरच्या अलमोरा पोस्टजवळ शुक्रवारी गस्तीवर असताना अचानक जवानांच्या बर्फाचा थर अंगावर कोसळला. यात दुर्दैवी घटनेत तीन जवानांना प्राण गमवावे लागले. घटनेनंतर सुरक्षा दलाच्या पथकाने बचाव कार्य सुरू केले. त्यांनी तिन्ही जवानांचे बर्फातून बाहेर काढले, त्याआधीच तिन्ही जवानांचा मृत्यू झाला.
कुपवाडा जिल्ह्यातील एसएसपी युगल मन्हास यांनी घटनेची पुष्टी करत प्रतिक्रिया दिली आहे. ' माच्छिल क्षेत्रात दुर्दैवी घटना घडली आहे. हिमस्खलनात सैन्य दलाचे ५६ राष्ट्रीय रायफल्सचे तीन जवान कर्तव्यावर असताना शहीद झाले. तिघांचे मृतदेह बर्फाच्या थरातून बाहेर काढण्यात आले आहे'.
धुळ्याचे सुपुत्राला जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण
धुळ्याचे सुपुत्र ४१ वर्षीय मनोज गायकवाड यांना जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण आलं आहे. मागील १५ वर्षांपासून देशसेवा करत होते. गस्तीदरम्यान त्यांच्यावर बर्फाचा कडा कोसळला. त्यावेळी तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे
0 Comments