काय आहे प्रकरण ?
चेन्नईतील पूनमल्ली परिसरात राहणाऱ्या एका महिलेचे आपल्या पतीशी संबध खराब झाल्याने प्रियकर राजू मणी नायर याच्याकडे रहायला आली होती. आरोपी राजू मणी नायर याने आपल्या मुलीचा सांभाळ करणार असल्याची कबूली दिल्याने ती त्याच्याकडे राहायला आली होती. पण आरोपी राजू याने १२ नोव्हेंबर रोजी तरूणीची आई घरी नसताना तिची गळा दाबून हत्या केली आणि तिच्या मृतदेहावर बलात्कार केला.
जेव्हा मुलीची आई घरी आली, तेव्हा घराला बाहेरून कुलूप लावले होते. तिने चावीने दरवाजा उघडला आणि तीची मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिच्या मानेभोवती खुणा होत्या आणि ती श्वास घेत नव्हती. नंतर जेव्हा आईने शेजाऱ्यांना विचारले असता, शेजाऱ्यांनी सांगितले की राजू दार लावून घाईघाईने निघून गेला.
पूनमल्ली पोलीस (कायदा आणि सुव्यवस्था) चे निरीक्षक पीआर चिदंबरमुरुगेसन यांनी सांगितले, "फॉरेन्सिक टीमने मला तोंडी सांगितले की मारेकऱ्याने मुलीच्या शरीराशी शारीरिक संबंध ठेवले होते. या खुलाशानंतर, पोलिसांनी यापूर्वी नोंदलेल्या गुन्ह्यामध्ये बलात्काराचे आरोप जोडले, त्यानंतर त्यांनी विरार पोलिसांना आरोपीची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चेन्नई पोलिसांना आरोपींना पकडण्यात मदत केली.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, गुन्हा केल्यानंतर नायर हा विरार येथे पत्नीकडे आला होता. पळून जाताना त्याने मयताचे आणि तिच्या आईचे मोबाईल घेतले होते. त्याने आपला फोन बंद ठेवला होता, तरी त्याने चोरीला गेलेला एक फोन चालू केला होता त्यावरून आरोपी विरारला असल्याचे समजले आणि त्याला अटक केल्याची माहीती पोलिसांनी दिली.
0 Comments