सलग पाच दिवस केली रेकी
घटनेच्या दिवसापासून परिसरातील गेल्या आठवड्याभराचे सीसीटीव्ही फुटेज एलसीबीच्या पथकाने घेतले होते. यामध्ये काही तरुण सलग पाच दिवस त्यांच्या घरावर नजर ठेवून रेकी करीत असल्याचे समोर आले. तसेच वेगवेगळ्या पथकाने फुटेजची तपासणी केल्यानंतर त्यांनी दरोडेखोरांच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्यांनी तपास करीत होते.
हालचालींवरुन पकडले गेले दरोडेखोर
दरोडा टाकणारे दरोडेखोर हे सराईत नसून स्थानिक असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी तांत्रिक मुद्दयांच्या आधारावर तपासचक्रे फिरवित शुक्रवारी रात्रीच्या सुमारास विदगाव गाठून, आव्हाणे, जैनाबाद याठिकाणाहून संशयित अनिल उर्फ बंडा भानुदास कोळी (वय-32), करण गणेश सोनवणे (वय-19), यश उर्फ गुलाब सुभाष कोळी (वय-21), दर्शन भगवान सोनवणे (वय-29), अर्जुन ईश्वर कोळी (पाटील) (वय-31), सचिन रतन सोनवणे (वय-25) व सागर दिलीप कोळी (वय-28, सर्व रा. विदगाव) यांना अटक केली.
या पथकाची कामगिरी
ही कामगिरी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषन पथकाचे उपनिरीक्षक अमोल देवढे, विजयसिंग पाटील, जयंत चौधरी, संदीप सावळे, किरण चौधरी, लोकेश माळी यांच्यासह गणेश चौबे, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, राजेंद्र पवार, रवी नरवाडे, राजेश मेढे, संजय हिवरकर, लक्ष्मण पाटील, प्रमोद ठाकूर, प्रवीण मांडोळे, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, रविंद्र पाटील, अशरफ शेख, महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, नंदलाल पाटील, अविनाश देवरे, दीपक शिंदे, दर्शन ढाकणे यांच्या पथकाने केली.
पैसे ठेवतांना बघितल्याने टाकला दरोडा
टोळीचा मुख्य सूत्रधार अनिल उर्फ बंडा कोळी हा वर्षभरापूर्वी बच्छावयांच्या चारचाकीच्या शोरुमध्ये गाडीचे कोटेशन घेण्यासाठी गेला होता. याठिकाणी त्याने बच्छाव हे बॅगेत पैसे ठेतव असल्याचे पाहिले होते. त्यानंतर त्याच्यावर हॉटेल व्यवसायामुळे कर्जाचा डोंगर झाला होता. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने गावातील मित्रांना सोबत घेत दरोड्याचा प्लॅन तयार केला. तसेच त्यांना दरोड्यातून मोठी रक्कम मिळेल असे आमिष देखील दाखविले होते.
0 Comments