डांबलेल्या दहा ऊसतोड मजुरांची मध्य प्रदेश पाेलिसांकडून सुटका; महिलेसह पाच जणांवर गुन्हा

पाचशे रुपये मजुरी आणि एक आठवड्याचे रेशन धान्य फुकट देतो अशी बतावणी करत मध्य प्रदेशातील बालाघाट येथील मजुरांना आणणे आणि ऊस तोडणी करायला लावून धान्य न देता ढोकबाभूळगाव येथे डांबून ठेवले. यातील पाच मजूर सुटका करून पळून गेले आणि बालाघाटच्या जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून स्वतंत्र बस करून मध्य प्रदेशातून पथक आले आणि मोहोळ पोलिसांच्या मदतीने १० मजूरांची सुटका करून घेऊन गेले. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाेन नोहेंबरला कालावटी तांडा येथे मुकादम शेशराव यादव आणि गोकुळ मेश्राम यांनी प्रवीण फुलसिंग इनवाती यांची भेट घेऊन आम्हाला ऊस तोडणीसाठी वर्धा येथे पाठविण्यासाठी मजूर पाहिजेत. महिला आणि पुरुष मजुराला ५०० रुपये मजुरी देऊ तसेच त्यांना एक आठवड्याचे रेशन फुकट देऊ असे आमिष दाखविले.
चर्चा झाल्यानंतर १० महिला आणि ५ पुरुष असे १५ मजूर ऊस तोडणीला जाण्यासाठी तयार झाले. ७ नोव्हेंबर रोजी हे १५ मजूर रेल्वेने अंबाजोगाई येथे आणले. तेथून तुम्हाला ऊस तोडण्याच्या ठिकाणी नेतो असे सांगून मुकादमाने त्यांना एका टेम्पोतून मोहोळ तालुक्यातील ढोकबाभूळगाव येथे आणले.
सर्वजण ऊसतोडीचे काम करत होते, परंतु ठरल्याप्रमाणे त्यांना काही किराणा साहित्य दिले आणि काही दिले नाही. ठेकेदार ट्रॅक्टर मालकास पैशाची आणि सामानाची मागणी केली असता पैसे आणि सामान तर दिलेच नाही. उलट बळजबरीने काम करून घेतले जात होते. काम न केल्यास कारखान्यावर नेऊन कोंडून टाकू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत प्रवीण फुलसिंग इनवाती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,या घटनेची गांभीर्याने दखल घेत बालाघाट प्रशासनाच्या माध्यमातून लेबर निरीक्षक राकेश ठाकूर यांच्यासमवेत एका स्वतंत्र बसची व्यवस्था करून पोलिस पथकासह ही टीम मोहोळला आली.

मोहोळ स्थानिक पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने ढोकबाभूळगावात जाऊन या सर्व १० मजुरांना ताब्यात घेऊन सुटका केली आहे. पोलिस पथकासह सर्व मजूर आता बालाघाटकडे रवाना झाले आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e