माझी वसुंधरा अभियानांतर्गत महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारीत स्पर्धाही घेण्यात आल्या. स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणार्या अमृत शहरांमध्ये धुळे महापालिकेचा समावेश झाला आहे. महापालिकेने उत्कृष्ठ कामगिरी करुन अमृत गटात नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकविला.
या पारितोषिकामुळे माझी वसुंधरा अभियान 3.2 च्या कार्यवाहीत गती निर्माण झाली असून अधिक यशस्वी व प्रभाविपणे कार्यवाही व अंमलबजावणी करण्यात येणार असून त्याबाबत कृती आराखडा महापालिकेतर्फे तयार करण्यात येवून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.पारितोषिक मिळाल्याबद्दल महापौर प्रदीप कर्पे, आयुक्त देविदास टेकाळे, स्थायी सभापती शीतल नवले, सभागृह नेते राजेश पवार, विरोधी पक्षनेते कल्पना महाले, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त विजय सनेर, संगीता नांदुरकर यांनी अभिनंदन केले आहे. सदर अभियान यशस्वीतेसाठी आरोग्य कार्यालय प्रमुख राजेंद्र माईनकर, मुख्य स्वच्छता निरिक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, चंद्रकांत जाधव, जुनेद अन्सारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments