शिरपूर तालुक्यातील सावळदे पुलावरून तापीत उडी घेत तरूणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरूणीचा पाण्यात बुडतांनाचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहेे. दरम्यान पुलावर चपला व ओढणी मिळून आली असून तरूणीची उशिरापर्यंत ओळख पटलेली नव्हती.
मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे तापी पुलावरून आज दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास एका तरूणीने तापीत उडी घेतली. ही बाब लक्षात येताच तिला वाचविण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र तरूणी पाण्यात खोलवर गेल्याने मिळून आली नाही.
तरूणी पाण्यात बुडत असतांनाचा पुलावरून काढलेला व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुलावर चप्पल आणि ओढणी मिळून असून तिची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
0 Comments