ट्रॅक्टर सोडून चालक पसार
ट्रॅक्टरचालकाने वाहनांना धडक दिल्यानंतर उपस्थित नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरु केला. दरम्यान, आपल्याला मारहाण होईल या भितीपोटी ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ट्रॅक्टर जमा केले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
सुदैवाने बचावले वाहनचालक
महामार्गावरुन जात असलेल्या जावेद शेख अजीज (वय-28, रा. पाळधी) या युवकाला ट्रॅक्टरने धडक दिली. त्यानंतर त्याच्या पुढे असलेल्या ज्ञानेश्वर ठोसरे (वय- 23, रा.खोटे नगर) याला देखील ठोकले. भरधाव वेगाने वाहन चालवित असलेल्या वाहनाने दोघ युवकांना धडक दिल्याचे बघताच रामकृष्ण मराठे (वय- 50, रा.खोटेनगर) यांनी आपले वाहन रस्त्याच्या कडेला उतरवून घेतले. परंतु तरी देखील ट्रॅक्टर चालकाने त्यांना धडक दिली. या अपघातात सुदैवाने मराठे हे रस्त्याच्या कडेला फेकले गेल्याने बचावले. वाहनांना धडक दिल्यानंतर पुढे अजून काही वाहनांना ट्रॅक्टर चालकाने उडविले. यामध्ये कारचालकाला धडक दिली असून त्याच्या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जखमींना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
0 Comments