नाशिकच्या पाथडी शिवारात नयनतारा गोल्ड या आलिशान सोसायटीत हा प्रकार उघडकीस आला आहे. नयनतारा गोल्ड येथील ई इमारतीमध्ये राहणारे गौरव जगताप (वय २८) आणि नेहा जगताप (वय २४) हे नवविवाहीत जोडपे राहत होते. रविवारी दिवसभरात कधी तरी या जोडप्याने घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. गौरव यास मावशीने संपर्क केला असता दोघांनी प्रतिसाद दिला नाही.
मावशीने गौरवच्या लहान भावाला फ्लॅटवर पाठवले. दरवाजा उघडत नसल्याने फ्लॅटचा दरवाजा तोडून आत पाहिले असता दोघांनी गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलिसांना कळवण्यात आले. यानंतर पोलिसांन मृतदेह खाली काढून पंचनामा केला. आर्थिक कारणातून हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पती– पत्नी दोघांच्या नातेवाईकांचे जबाब घेण्यात येणार आहे. वरिष्ठ निरिक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
0 Comments